जेवण केल्यानंतर १० मिनिटे अस झोपा अपचन, पित्त, पोटदुखणे, पोटाचा घेर गायब.
आजकाल ९०% केसेस या अपचनाच्या असतात आणि त्या अपचनामुळे शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. खाल्ल तर पोट जड वाटणे, छातीत जळजळणे, भूक न लागणे, काहीही खाल्लं की पोटात मळमळ होणे, पोटात गॅस तयार होणे, तोंडाला वास येणे आणि जिभेवर थर साचने ही अपचनाची लक्षणे आहेत. पचनाची जी सुरुवात असते ती तोंडामधून होत असते. नीट चावून न खाणे, घाई घाई मध्ये जेवणे यामुळे अपचनाच्या समस्या आहेत त्या निर्माण होतात. त्याचबरोबर काही जणांना खाल्लेल्या अन्नामध्ये पाचक रस ते व्यवस्थित मिक्स न झाल्यामुळे, जठरामध्ये जे अन्न आहे ते नीट न घुसळल्यामुळे या अपचनाच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे अन्नपचनासाठी जे हायड्रोक्लोरिक ऍसिड असत, HCL असत ते जास्त प्रमाणात शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतात आणि त्यामुळे आपली जी आतडी आहे ती सडू लागते. यामुळे विषारी पदार्थ तयार होतात. हे सर्व शरीरामध्ये मिसळून अनेक आजार आपल्याला होत असतात. काहीजण घाई घाईने खातात न चावता गिळतात आणि त्यामुळे काय होत असत अमाशावर ताण पडतो, आणि त्यामुळे जास्त प्रमाणात HCL तयार होत. त्याचबरोबर आपण पटापट घास गिळत असतो त्याबरोबरच त्या घासाबरोबर हवा सुध्दा आपल्या पोटामध्ये जात असते आणि ही हवा पोटामध्ये गेल्यानंतर जेव्हा घुसळण्याची क्रिया पोटामध्ये सुरुवात होते तेव्हा या हवेमुळे जठरामधल हायड्रोक्लोरिक ऍसिड ते वर फेकले जाते. त्याला आपण गिळकी आली बोलतो. ते वर फेकलं जात आणि त्यामुळे आपल्या छातीमध्ये प्रचंड जळजळ होते, तोंड आंबट पडत, छातीमध्ये प्रचंड वेदना होतात. या प्रकारचे आजार हे अपचनामुळे होत असतात. तर या अपचनासाठी तुम्हाला कुठलाही औषध घ्यायची गरज नाही.उपाय
सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जेवणानंतर दहा मिनिटे जर झोपले तर तुमच जे अपचन आहे ते पूर्ण पणे निघून जाते. याला वैदकीय कारण आहे, आणि त्यामुळे तुमच जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीने होत असत. तर जेवण झाल्याबरोबर दहा मिनिट तुम्हाला डाव्या अंगावर झोपायच आहे.आपला डावा हात डोक्याखाली घालून झोपायच आहे. या पद्धतीने झोपल्यामुळे काय होत ते सांगितल्याप्रमाणे पचनाची सुरुवात जी आहे तोंडापासून होते परंतु पचनाच वरवरीत कार्य आहे ते जठरामध्ये होत असते. जठरामध्ये अन्न घुसळ जात त्यामध्ये विविध प्रकारचे पाचक रस आहेत ते मिक्स होत असतात. त्याचबरोबर घासा बरोबर जी हवा गेलेली असते ती हवा वर काढण्यासाठी आपल्याला एका पोझिशन मध्ये यायला गरजेच असत आणि म्हणून जेवणानंतर लगेच दहा मिनिट जर याप्रमाणे झोपलात तर जठरात जी हवा गेली असते ती सहज रित्या बाहेर येते. याचबरोबर तुम्ही डाव्या अंगावर झोपता त्याच वेळेस जठराची जी पोझिशन आहे ती अगदी योग्य पद्धतीने येते. अन्न घुसळण्याची ती योग्य पोझिशन असते अन्न व्यवस्थित चांगल्या पद्धतीने घुसळल जाते. त्याचबरोबर तुम्ही जेव्हा अस झोपता त्यावेळेस खाल्लेले अन्न आहे ते चांगल्या घुसळल्याशिवाय आतडीमध्ये पुढे सरकत नाही. हे योग्य होण्यासाठी आपल्याला दहा मिनिटाची गरज असते. त्याचबरोबर लिव्हर जे आहे हे लिव्हर मधून जे पाचक रस असतात ते जठरामध्ये मिक्स होण्यासाठी ही पोझिशन एकदम बरोबर आहे. ही क्रिया एकदम साधी आणि सोपी आहे फक्त जेवल्याबरोबर लगेच दहा मिनिटे डाव्या अंगावर झोपायचे आहे. यामुळे अपचनाचा त्रास निर्माण होतो तो होणार नाही. हे तुम्ही आवश्य करून बघा.



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.