सर्दी पडसे, खोकला बरा करणारा हा गोड घरगुती उपाय
मित्रांनो सर्दी, खोकला, ताप यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. सर्दी पडसे आपल्यासोबत घेऊन येते, अंगदुखी, डोकेदुखी, कधी न जाणारा खोकला. पाण्यातील बदल, हवामानातील बदल किंवा इतरांचे व्हायरल इन्फेक्शन या कोणत्याही कारणाने झालेली सर्दी वेळेतच कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहे. याचा वापर दोन ते चार रात्रीच्या वापराने सर्दी, ताप आणि खोकला अगदी बरा होईल.उपाय
सर्दी, ताप, खोकला बरा करणारा हा काढा बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक ग्लास पाणी एका भांड्यात गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. यानंतर अर्धा चमचा जिरे आणि साधारण चार ते पाच काळ्या मिऱ्या या दोघांना बारीक करून घ्यायचे आहे. यानंतर आपण त्या गरम पाण्यामध्ये गूळ टाकायचे आहे. त्यानंतर बारीक केलेले जिरे आणि काळ्या मिरचीचे वाटप हे त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर या सर्वांना चांगले उखळवायचे आहे. साधारण अर्धा ग्लास पाणी शिल्लक राहिल्यावर उखळवणे थांबवून हे मिश्रण गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे. आता गुळाचा काडा तयार झाला. हा गरम कोमट असताना त्याच सेवन करायचे आहे. तुमचा खोकला, सर्दी याच्या पहिल्याच वापरापासून बरी होयला सुरुवात होते. हा काडा लहान मुलांना ही याच्या निम्माप्रमानात प्यायला द्यावा. हा उपाय तुम्ही आवश्य करून बघा कारण या उपायाला काहिकी खर्च नाही.(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)


0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.