खोकला, सर्दी, कसलीही एलर्जी एका दिवसात आराम

खोकला, सर्दी, कसलीही  एलर्जी एका दिवसात आराम

खोकला, सर्दी, कसलीही  एलर्जी एका दिवसात आराम 

शरीरामध्ये कफ जर जास्त निर्माण झाला, तर आपल्याला खोकला येत असतो.   एलर्जी :- एखादा पदार्थ आपल्याला सहन होत नाही, वातावरण सहन होत नाही, धूळ सहन होत नाही, थंडी सहन होत नाही याला आपण एलर्जी म्हणतो. एलर्जीमुळे सर्दी, घशामधील खवखव, घसा दुखी या अशा समस्या जाणवतात. 


आता खोकला येतो म्हणजे काय होत? तर शरीरामध्ये जास्त कफ झालेला असतो तो बाहेर फेकण्यासाठी शरीर प्रयत्न करत आणि मग आपल्याला खोकला येतो. त्याचपद्धतीने कोरडा खोकला पण असतो. घशामध्ये खवखव  होत असेल, घशाला सूज आली असेल, श्वसननलिकेला सूज आली असेल तरी आपल्याला खोकला येत असतो. अशा या खोकला आणि एलर्जी यावर अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आज तुम्हाला सांगणार आहे. अतिशय सोपा उपाय आहे. एका दिवसामध्ये तुमचा खोकला पूर्णपणे बरा होतो. घशाचे इन्फेक्शन जे झालेले आहे ते पूर्णपणे निघून जाते आणि पाच दिवसामध्ये तुमच्या एलर्जी पासून मुक्तता मिळून जाते. असा हा उपाय आहे. तो उपाय तुम्हाला सांगणार आहे.


खोकला, सर्दी, कसलीही  एलर्जी एका दिवसात आराम

आवश्यक घटक

या उपचारासाठी आपल्याला साधं खाण्याचं पान लागणार आहे आणि आपल्याला ओवा लागणार आहे. या ओव्यामध्ये कॅल्शियम, लोह कॅरोटीन आणि याच्या तेलामध्ये थायमिन नावाचा घटक असतो, तो आपल्या शरीरातील कफ मोकळा आणि पातळ करण्याचे काम करतो. त्याचप्रमाणे या पानामध्ये सुद्धा कॅल्शियम, कॅरोटीन, थायमिन असतं आणि यामध्ये व्हिटॅमिन c भरपूर प्रमाणात असते, यात खनिजे पण मोठया प्रमाणामध्ये असतात. पान हे अन्न पचनाचे सुद्धा काम करते. हे जेव्हा पान आणि ओवा दोन्ही एकत्र करून आपण खातो ते कॉम्बिनेशन तुमच्या शरीरातील कफ म्हणजे तुम्हाला कोरडा खोकला किंवा कफ खोकला असेल तर एकाच दिवसामध्ये तुम्हाला त्याचा आराम मिळतो आणि पाच दिवसमध्ये एलर्जीपासून मुक्तता भेटते. सलग पाच दिवस सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही वेळी हा उपाय करु शकता. हा उपाय तुम्ही जेवण करून करू शकता, उपाशीपोटी करू शकता, कधीही करू शकता. पान आपण खातो, ओवा आपण खातो. फक्त हे दोन्ही घटक आपल्याला एकत्र पद्धतीने खायचं आहे. 


खोकला, सर्दी, कसलीही  एलर्जी एका दिवसात आराम


कसे खावे

तुम्हाला हे कसं खायच आहे ते सांगतो. एक साध खायचं पान स्वच्छ धुऊन घ्यायच आहे. त्याचा देठ पूर्णपणे कापुन टाकायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा आहे. यामध्ये कोणताही दुसरा पदार्थ ऍड करायचा नाही. हे जे पान आहे आपल्याला जेवढे हळूहळू खाता येईल तेवढ आपल्याला हळूहळू चावून त्याचा रस गिळायचा आहे, थुकायचा नाही. पुर्णपणे रस गिळून घ्यायचा आहे. या दोघांच मिश्रण हळूहळू तुमच्या अन्ननलिकेतून पास होत तेव्हा घशामधच इन्फेक्शन पुर्णपणे घालवून टाकते. त्याप्रमाणे कफ झालेला असेल तो पण पुर्णपणे गायब करून टाकतो. 
तुम्ही हा उपाय एकदा करून बघा तुम्हाला लगेच अनुभव येईल. खोकल्यासाठी तुम्हाला कोणत्याही दुसऱ्या औषधाची गरज भासणार नाही. ओवा आणि पनाने कोणताही site effect होत नाही. आपण जेव्हा ओवा आणि पान खात असतो तेव्हा ते तिखट लागले. तिखट न लागण्यासाठी तुम्ही त्यामध्ये अर्धा चमचा मध टाकून खाऊ शकता.

साथीच्या आजारावर कुठलेच औषध घ्यायची गरज नसते. त्यासाठी हा अतिशय सादा आणि सोपा आयुर्वेदिक उपाय केला तर काही मिनिटात आराम मिळतो. विविध प्रकारच्या एलर्जी होऊ लागल्या असतील तर त्यासाठी हा उपाय वरदान आहे. 


टिप:- या ब्लॉग वर सांगितलेले सर्व उपचार हे भारतीय आयुर्वेद पारंपरिक उपचार तसेच आजी आणि आजोबा यांनी सांगितलेले उपचार आहेत. उपचार करण्याआधी तुमच्या आजाराची खात्री करावी तसेच वनस्पतींची ओळख खात्रीपूर्वक करून घ्यावी. प्रत्येक व्यक्तीची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असते त्यामुळे उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्यावा. वरील सांगितलेल्या उपचाराने काही विपरीत परिणाम होणार असतील तर त्याला हा ब्लॉग आणि ब्लॉग चालवणारा जबाबदार असणार नाही.

 वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या