मला बऱ्याच जणांच्या comment आल्या की सतत होणाऱ्या किंवा कायम स्वरूपी सर्दी होते त्यावर उपाय काय?
सर्दीवर तर भरपूर उपाय आहेत. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या सवयी बदलाव्या लागतील आणि कुठलाही उपाय करण्या अगोदर जर सवयी बदलल्या तर त्याचा उपयोग होतो. काहीजण बोलतात की हा उपाय करून बघतला तो उपाय करून बघतला पण काहीही फरक पडला नाही तर त्यासाठी तुमच्या सवयी बदलाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला दोन सवयी सांगणार आहे. त्यातली एक तुम्हाला बदलायची आहे तर दुसरी तुम्हाला अंगी पाडून घ्यायची आहे. या सवयी जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये अवलंबीत केलात तर तुम्हाला आयुष्यात कधीही सर्दी होणार नाही. एकदम साधी आणि सोप्या सवयी आहेत त्या आपल्याला माहीत नाही त्यामुळे आपल्याला सर्दीचा त्रास होतो.
पहिला उपाय
पहिली जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे झोपण्याच्या आधी २ तास पाणी पियायचे नाही,काही जणांना सवय असते झोपण्याअगोदार पोटभर पाणी पितात आणि झोपतात. पोटभर पाणी पियालेले चांगले असते पण ते कधी याचा वेळ असतो. पोटभर पाणी पियाल्याने शरीराची क्षमता चांगली राहते. पण त्या पेक्षा जास्त पाणी प्यालो तर शरीरावर गंभीर परिणाम होतात, किडणीवर पण जास्त प्रेशर येते. जेवढे आवश्यक आहे तेवढे पाणी प्याव. पाणी प्यावं पण कधी प्यावं याला फार महत्त्व असत. तर तुम्ही झोपण्याच्या आधी २ तास आधी पाणी प्यायचे आहे. त्यानंतर २ तास झोपायचे नाही. ही एक साधी गोष्ट आहे. पण ही आपल्याकडून सहज होऊन जाते आणि आपल्याला लक्षात येत नाही. आपण बरेच उपाय शोधतो, पण सर्दी का होते हे माहीत नाही. सर्व checking करतो, mediclim करतो पण त्याच्यामध्ये आपल्याला काहीच सापडत नाही. फक्त तात्पुरती थांबते व ४-५ दिवसांनी परत सुरू होते. म्हणून तुम्ही या गोष्टी follow करा. तुम्ही जर झोपण्याआधी दोन तास पाणी प्यायलो नाही तर तुम्हाला सर्दी होणार नाही.![]() |
दुसरा उपाय
दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी अंघोळ करताना तोंडामध्ये थंड किंवा गरम पाणी ठेवलं तर त्यामुळे तुम्हचे जे नाक आणि घशाचे जे कनेक्शन आहे ते मोकळे राहण्यास मदत होते. जे इन्फेक्शन घशामध्ये झालेले आहे ते पण पूर्ण पणे निघून जाते. सर्दीची पण समस्या यामुळे निघून जाते. जर हे तुम्ही हे नेहमी नियम follow केले तर तुम्हाला सर्दी किंवा घशाची खवखव, कप यासारखे आजार होणार नाही, फक्त हे उपाय व्यवस्थित करा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.