डोकेदुखी, मानदुखी, पाठदुखी, पित्त आणि कफ कधीच होणार नाही, झोपायची योग्य दिशा या पद्धतीने झोपा
पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, पित्त आणि कफ यांचे कारण
झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक आहे. दिवसभर शरीराची आणि मनाची जागेपणी झालेली जी झीज आहे, ही मोडतोड भरून काढण्यासाठी झोप ही आवश्यक असते. वयानुसार किती झोपाव हे तुम्हाला माहित असेल. नवजात मुलाला १८-२० तास झोप पाहिजे. तरुण पिढीला १०-१२ तास झोप पाहिजे, पौढव्यक्तिंना ७-८ तास झोप पाहिजे, वृद्धव्यक्तिंना ५-६ तास झोपलं पाहिजे. या झोपेच्या वेळेविषयी तुम्हाला माहित असेल. परंतु काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून नकळत होत असतात, झोपेतून त्या नकळत होतात त्या आपल्या लक्षात येते नाही त्यामुळे विविध प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला होत असतात. तर यामध्ये डोकेदुखीची जी समस्या आहे ती ७०% लोकांमध्ये चुकीच्या झोपल्यामुळे निर्माण झालेली आहे. ज्या व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून झोपतात त्या व्यक्तीना डोकेदुखीची समस्या होत असते. अस का होत हे माहीत आहे का? तुम्ही एक स्वतः चुंबक आहात. शरीरसुद्धा एक चुंबकीय क्षेत्र आहे, डोक्याकडचा जो भाग आहे त्याला North Hol म्हटलं जात आणि पायाकडील भागाला South Hol म्हटलं जात. ज्या वेळेस उत्तरेकडे तोंड करून झोपले जातो त्यावेळेस डोकेदुखी सारखी समस्या निर्माण होते. अगदी ही साधी आणि सोपी गोष्ट आहे सहज करण्यासारखी आहे. तुम्ही करून बघा १०ते ११ दिवस . उत्तरेकडे तोंड न करता पूर्वेकडे तोंड करून झोपा कुठल्याही अंगावर झोपा. प्रत्येक व्यक्तीनी पूर्वेकडे तोंड करून झोपले पाहिजे. उत्तरेकडे तोंड करून झोपणे हे आपल्या शास्त्रामध्ये व्यर्ज सांगितले आहे कारण उत्तर ही मृत्यूची दिशा आहे. मृत व्यक्तींना उत्तरेकडे तोंडकरून दफन केलं जातं किंवा त्याचा अंतिम विधी केली जाते म्हणून उत्तरेकडे तोंड करून झोपू नये असे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितले आहे. शास्त्र माना की नको मानू याला वैज्ञानिक आधार आहे म्हणून पूर्वेकडे तोंड करून झोपा, उत्तरेकडे तोंड करून झोपू नका. जर झोपलात तर डोकेदुखी सारखी समस्या निर्माण होईल. आता ज्यांना पित्त आणि कफ होतो अशा व्यक्तींनी सांगितल्या प्रमाणे झोपून बघा. तुमचा पित्त आणि कफ चा त्रास निघून जाईल. वात, पित्त आणि कफ शरीरामध्ये असतात आणि ते योग्य बॅलन्स मध्ये असेल तर आरोग्य चांगल राहत असत. परंतु आपल्या चुकीच्या खाण्यामुळे, चुकीच्या झोपण्यामुळे या मधीले जे दोष असतात ते बिघडले जातात त्यामुळे या समस्या निर्माण होतात. ज्यांना पित्त आणि कफ होतो अशा व्यक्तींनी दुपारचे कधीच झोपू नये. त्यांनी कमीत कमी ६-७ तास झोलेच पाहिजे. त्यांनी जेवल्यानंतर१०ते १५ मिनिटे डाव्या कुशीवर झोपायचे आहे. त्यामुळे जे पाचक रस असतात ते अन्नमध्ये चांगले मिसळतात, त्यामुळे पित्ताचा जो त्रास आहे तो Automatically कमी होतो. या दोन गोष्टी जरी पाळल्यात तर तुम्हाला कफ आणि पित्त होत ते तुम्हाला कधीच होणार नाही.![]() |
| Image Source - Google / Image by Pixabay |
उपाय
पाठदुखी आणि मानदुखी ही समस्या ७०- ८०% लोकांना चुकीच्या झोपल्यामुळे होते. सकाळी उठल्याबरोबर मान भरलेली असते. किंवा पाठीमध्ये चमक भरत असते. ही आपल्याकडुन नकळत होणारी गोष्ट आहे. परंतु यावर लक्ष केंद्रित केल, व्यवस्थित झोप घेतली तर तुमचा जो आजार आहे तो सहज रित्या बरा होऊन जाईल. ज्यांना पाठदुखी आणि मानदुखी चा त्रास आहे अशा व्यक्तींनी गादीचा वापर करायचा नाही, खाली जमिनीवर जे अंथरूण असेल त्या अंथरुणावर झोपव. जागा ही सपाट असावी झोपण्यासाठी. जर तुम्हाला एक कुशीवर झोपायची सवय असेल तरच उशीचा वापर करायचा आहे, ते पण कमी उंचीच्या उशीचा वापर करायचा आहे. तुमच्या शरीराच्या लेव्हलला, खांद्याच्या लेव्हलला उशीचा वापर करायचा आहे. जमिनीवर झोपल्यामुळे आपल्या पाठीचे जे मणके आहे ते सरळ होतात त्यामुळे हा जो त्रास आहे तो Automatic निघून जातो. गादीवर झोपल्यामुळे मणके जे आहे त्यांना वाकडे पणा निर्माण होतात. त्यामुळे अतिरिक्त ताण पडतो आणि पाठदुखी व मानदुखी चा त्रास होतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी गादीवर झोपू नये खाली जमिनीवर झोपव. झोपण्याच्या आधी थंड पाण्याने पाय धुतले तर चांगली झोप येते. ज्या व्यक्तींना गुडघेदुखी आणि पायदुखीची समस्या आहे, टाच दुखीची समस्या आहे अशा व्यक्तींना गरम पाण्यामध्ये झोपण्याच्या आधी जेवढे सहन होईल तेवढे गरम पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडस मीठ टाकायचे आहे. १० ते १५ मिनिटे शेक घ्यायचा आहे. त्यानंतर गुडघे दुःखी आणि पायदुखीचा त्रास निघून जातो.
जर या गोष्टी नीट नियमानुसार केल्यात तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही.



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.