लिव्हरची सूज कारणे आणि उपाय | Fatty Liver Causes And Treatment


लिव्हरची सूज कारणे आणि उपाय

Fatty Liver Causes And Treatment


    नमस्कार, आज आपण लिव्हरची सूज त्याची करणे आणि उपाय याविषयी माहिती घेणार आहोत. लिव्हरची सूज सोनोग्राफी केल्यामुळे दिसून येते. त्यामुळे या अवस्थेला नाव दिल आहे fatty liver आणि आपण या अवस्थेला आजार म्हणतो. Fatty Liver म्हणजे लिव्हरमध्ये कफाची संचीती जास्त झाली, लिव्हरवर लोड आला कि लिव्हरला सूज येते यालाच fatty liver असं म्हटलं जात. याचा अर्थ असा कि हा काही रोग नाही आहे, ती एक अवस्था आहे. आणि या अवस्थेला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही अवस्था जर आपण ओळखली तर नक्की आपण लिव्हर च आयुष्य वाढू शकतो. 

लिव्हरची सूज कारणे आणि उपाय | Fatty Liver Causes And Treatment

लिव्हरच कार्य (what is fatty liver) :

    या लिव्हरच काम काय असतं ?  जेव्हा आपण खातो-पितो, म्हणजे खातो म्हणजे अन्नपदार्थ आणि पितो म्हणजे द्रवपदार्थ. हे अन्न आणि पाणी जेव्हा आपल्या शरीरात जात तेव्हा या शरीरामध्ये या अन्नातून पचनातून तयार झालेले जे टॉक्सिन असतात, किंवा खालेल्या अन्नामध्ये जे विषजन्य पदार्थ असतात हे सर्व एकत्र करून त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकण्याच काम लिव्हर करत असत. नाहीतर हे काम पुढे जाऊन किडनीला कराव लागत. पण त्या आधी हा पहिला फिल्टर जो आहे तो म्हणजे लिव्हर. या लिव्हरच आणखी एक काम असत ते म्हणजे पित्ताच नियंत्रण करणे आणि आणखी एक काम म्हणजे रक्त तयार करणे. या लिव्हरला खूप काम असतात. स्निग्ध पदार्थ म्हणजे ज्याला आपण fat म्हणतो या fat च पचन करायचं हे सर्वात मोठ काम हे लिव्हर करत असत. आपण खालेले तेलकट पदार्थ असतील, आपण खालेले बटर असेल, चीज असेल, पनीर असेल हे सर्व कफ वाढवणारे पदार्थ आहेत. आणि या पदार्थांचे पचन लिव्हर वर अवलंबून असत. पित्ताशयाचा लोड देखील लिव्हर वर असतो आणि लिव्हर चा दाब देखील पित्ताशयाला झेलावा लागतो. हे दोन्ही अवयव एकमेकांच्या सहायाने राहत असतात. पित्ताशयाचा लोड वाढला कि या लिव्हर मध्ये बदल होतात आणि लिव्हर चा लोड वाढला कि या पित्ताशयावर दाब येऊ शकतो आणि पित्ताशयामध्ये खडे वाढण्याची प्रवूत्ती वाढत जाते.


लिव्हरची सूज कारणे आणि उपाय | Fatty Liver Causes And Treatment

लिव्हरची सूज यावर उपाय | Fatty Liver Treatment

    आपल्याला लिव्हर चा लोड कमी करण्यासाठी लिव्हरला विश्रांती देणे आवश्यक असते. पचन करण हे जर लिव्हर च काम असेल तर पचनासाठी लिव्हर ला तीन तास लवकर दिले त लिव्हर चा लोड कमी होण्यास मदत होते. 

    आता यावर जर थेट उपाय सांगायचा झाला तर सगळी पाचक औषधे जी आहेत ती पाचक औषधे लिव्हर ची सूज कमी करायला मदत करतात. Fatty Liver म्हणजे सूज नव्हे. लिव्हर मध्ये कफाची संचीती जास्त होणे, द्रवाची संचीती जास्त होणे आणि त्यामुळे लिव्हर थोडी Fat दिसण याला आपण fatty liver म्हणतो. लिव्हर ला सूज आल्यासारखा वाटण पण प्रत्यक्षात हि सूज नसते. पण या fatty liver मुळे भुकेवर परिणाम होतो, भूक अनियमित लागते, अन्नपचन निट होत नाही, अन्नपचन नीट न झाल्यमुळे गॅस निर्मिती होते आणि त्यामुळे पोट फुगलेले राहत. 

    यावर सगळ्यात सोप्पा उपाय म्हणजे लंगण करण. लंगण हा आयुर्वेदात सगळ्यात सोप्पा मार्ग सांगितला आहे. लिव्हर चा लोड कमी करण्यासाठी लिव्हर ला थोडी विश्रांती द्यायची. आधी जो लिव्हरचा लोड आहे, आपल्या शरीरात असलेली टॉक्सिन, खाद्यपदार्थांमधील विषाणू पदार्थ, रोगजंतूंनी मारलेल्या काही पेशी हे सर्वच लिव्हरला बाहेर टाकायचं असत. मग हे लिव्हरच काम जास्त झाल, लोड खूपच वाढत गेला की लिव्हरच कार्य कोलमडून जातं आणि त्यामुळे त्याच्यावर अवलंबून असलेली पुढची एंजाईम्स असतात ती देखील काम करायचं सोडून देतात. मग त्याच्यातून पुढे तयार होणारा आजार हा कदाचित कावीळ असू शकतो. लिव्हरशी संबंधित असलेला आजार कावीळ हा देखील पचनाशी अवलंबून आहे. कावीळ हा आजार आहे पण फॅटी लिव्हर हा आजार नाही. 
         
    लिव्हरला विश्रांती, पोटाला विश्रांती, शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती देणं आवश्यक आहे. झोप पूर्ण घेतली तरी देखील पचन पूर्ण होत असत. फॅटी लिव्हर होण्याच आणखी एक कारण आपण अनियंत्रित झोप घेत असतो. दिवसाची झोप घेत असतो, हे सुद्धा फॅटी लिव्हर होण्याच कारण असू शकत. 

    शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश आला नाही तर त्या लिव्हरला जी पुरेशी एनर्जी पाहिजे ती सुद्धा पुरत नाही. थेट सूर्यप्रकाशात लिव्हरच काम हे चांगलं होत असत. सूर्यप्रकाश म्हणजे बर्फाचा विलयन होणं, घट्ट पदार्थच रुपांतर द्रवपदार्थात होणं. अशाप्रकारे लिव्हरमध्ये साठलेल्या कफाचा रूपांतर द्रावमध्ये करण्याचं काम देखील सूर्यप्रकाश करतो. रोज सूर्यप्रकाश घेणं व त्याबरोबर व्यायाम कारण त्यामुळे लिव्हरमधील फॅट नाहीसे होण्यास मदत होते. फॅटी लिव्हर हा रोग नाही. योग्य काळजी जर घेतली, अन्नपचन जर व्यवस्थित होत असेल, जेव्हा भूक लागेल तेव्हाच जर आपण जेवलो तर काहीच हरकत नाही. भूक नसताना जेवण व भूक असताना न जेवण, जेवल्यावर पुन्हा जेवण, आहार विरुद्ध खाण हे सर्व जे आहे लिव्हरचा लोड वाढवत आणि लिव्हरला फॅट बनवत. म्हणून एक दिवस लंगण , एक दिवस उपवास किंवा एक दिवस द्रव आहार नक्की करा. यामुळे शरीराला आराम मिळतो. हा उपाय नक्की करून पाहा . तुमच्या लिव्हरच कार्य नक्की चांगले होईल. लिव्हरची सूज ही निघून जाईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या