फक्त 3 वेळा हे पाणी घ्या
उष्णतेचे सर्व त्रास गायब, शरीर राहील थंडगार
नंतर कोणत्याही vitamins ची कमतरता पडणार नाही
फक्त 3 वेळा हे पाणी घ्या
उष्णतेचे सर्व त्रास गायब, शरीर राहील थंडगार
नंतर कोणत्याही vitamins ची कमतरता पडणार नाही
फक्त 3 दिवस हा साधा, सोपा आयुर्वेदिक उपाय करा. उष्णता आणि उष्णतेचे सर्व त्रास तुमच्या शरीरातून पूर्णपणे निघून जातील. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वाना करता येणारा हा उपाय आहे. उष्णतेचा त्रास तुम्हाला कुठलाही असेल, डोळ्यांची जळजळ, हाता- पायाची आग होत असेल, तोंड येत असेल म्हणजे तोंडामध्ये फोड येत असतील, छातीमध्ये जळजळ होत असेल, पोटामध्ये जळजळ होत असेल, खूप घाम येत असेल किंवा घमोळ्या खूप येत असतील, उष्णतेमुळे डोके दुखत असेल, अपचनाचा त्रास होत असेल किंवा थकवा जाणवत असेल, उष्णतेमुळे चक्कर येत असेल. अशी कुठलेही समस्या उष्णतेची असतील तर हा उपाय करा. ज्यांना उष्णतेच्या समस्या नसतील त्यांनी सुद्धा हा उपाय केला तर अंगामध्ये जोश, शक्ती वाढते. तर यासाठी आपल्याला तीन वस्तू लागतात. ते आपल्याला सहज रित्या उपलब्ध होतात तर या वस्तू कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर कसा करायचा आहे ते पुढे सांगणार आहे.
तर यासाठी लागत एक कपभर नारळ पाणी. तुम्हाला माहीतच असेल नारळाचं पाणी हे सलाइन सारख काम करते. शरीराला energy देते. त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषणतत्त्वे असतात. यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅगनॅशियम, सोडियाम आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विविध प्रकारच अँटी ऑक्साईड असतात. तुम्हाला माहित आहे गुणधर्मामध्ये ते थंड असत. दुसरी गोष्ट म्हणजे जिरे लागणार आहे. फक्त तीन दिवस हा उपाय करायचा आहे. तीन चमचे जिरे भाजून घ्यायचे आहे(एका व्यक्तीसाठी). नंतर त्या भाजलेल्या जिऱ्याची पूड करायची आहे. जिरे हे प्रकृतीने थंड असते. यात vitamin c असत आणि vitamin A असत. सर्व प्रकारची पोषक तत्त्वे असतात. पाचक रस असतात. वायुनाश करणारे घटक त्यात असतात. अशा या जिऱ्याची पूड एक चमचाभर लागणार आहे. तिला नारळपाण्यामध्ये मिक्स करायची आहे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गूळ घ्यायचं आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी गुळ नाही वापरलं तरी चालेल. पण ज्यांना मधुमेह नाही त्यांनी गुळ जरूर वापरा. गुळ हा इंस्टंट energy देणारा नैसर्गिक घटक आहे. यात गुलकोज चे प्रमाण असते. उष्णतेच्या समस्यासाठी गुळ हे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला माहित असेल की पूर्वीच्या काळात उन्हातून आलेल्या व्यक्तींना सुरुवातीला गुळाचा खडा देतात आणि नंतर प्यायला पाणी देतात. या मिश्रणात गुळाचा छोटासा खडा मिक्स करायचा आहे. एक कप नारळ पाणी, एक चमचा जिऱ्याची पूड, एक गुळाचा खडा या तिघांचे मिश्रण करून घ्यायचे आहे. दिवसभरात हे मिश्रण एक वेळा कधीही प्यायचे आहे. फक्त जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर एक तासाच अंतर ठेवायच आहे.
सलग तीन दिवस हा उपाय करायचा आहे. कुठलाही त्रास असेल तो पूर्णपणे बरा होऊन जातो. फार पूर्वी पासून हा आयुर्वेदिक उपाय केला जातो. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, एकदा करून बघा.



0 टिप्पण्या
Please do not enter any spam link in the comment box.